नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरच्या नागौममध्ये भारतीय सेना आणि दहशतवाद्यांच्यामध्ये १९ सप्टेंबर रोजी झालेल्या चकमकीत मदनलाल शर्मा शहीद झालेत. २० डोगरा युनिटचे ते हवालदार म्हणून कार्यरत होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारी शर्मा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी, त्यांच्या ८० वर्षीय आईनं त्यांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि सगळ्यांच्याच अश्रूचे बांध फुटले. आईच्या धीराला सगळ्याच उपस्थितांनी सलाम केला.


माझ्या मनगटांत अजूनही ताकद आहे, असं यावेळी शर्मा यांच्या आईनं म्हटलं. मदनलाल शर्मा यांच्या मागे त्यांची आई, पत्नी भावना, पाच वर्षांची मुलगी श्वेता आणि अडीच वर्षांचा मुलगा कन्नव असा परिवार आहे. 


१८ सप्टेंबर रोजी उरीस्थित भारतीय सेनेच्या बेस कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यानंतर १९ सप्टेंबर रोजी भारतीय सेनेनं दहशतवाद्यांना टार्गेट केलं. यावेळी १० दहशतवादी मारले गेले होते.