नवी दिल्ली : संसदेच्या हिवाळी अधिवेशन संपायला 2 दिवस बाकी आहेत. 16 नोव्हेंबरपासून सुरु झालेलं हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरला संपणार आहे. पण नोटबंदीच्या विरोधामुळे एक दिवसही अधिवेशन सुरळीत चाललं नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात सर्व विरोधी पक्ष एकवटले. रस्त्यापासून ते संसेदपर्यंत त्यांनी याविरोधात निदर्शने केली. 


नोटबंदीच्या मुद्द्यावर आज देखील संसदेत गोंधळाची शक्यता आहे. काँग्रेस आणि भाजपने आपल्या खासदारांना व्हिप जारी करुन संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. संसदेचं सत्र सुरु झाल्यापासूनच विरोधत नोटबंदीच्या मुद्यावर पंतप्रधानांनी बोलावं अशी मागणी करत आहे. सरकारपुढे 2 दिवसात अनेक बिलं पास करण्याचं आव्हान आहे.