नवी दिल्ली : रेल्वे लातूरपर्यंत ठेवण्यास रेल्वे मंत्रालयाने नकार दिला आहे. मुंबई-बिदर रेल्वे सुरूच राहणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे लातूरकरांची मागणी रेल्वे मंत्रालयाने फेटाळली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पर्याय म्हणून बिदर ते मुंबई नवीन रेल्वे सुरू केली जाणार आहे. त्यामुळे १ जूलै रोजी लातूरला नवीन रेल्वे मिळणार आहे.


येत्या १ जुलैपासून लातूरकरांना नवीन रेल्वे मिळणार आहे. संभाजी निलंगेकर पाटील यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन चर्चा केली. 


त्यावेळी नवीन रेल्वे लातूरवरून यशवंतपूरला धावेल, असं आश्वासन सुरेश प्रभूंनी दिलं. वर्षअखेर लातूरला तिसरी रेल्वे मिळेल, असंही प्रभूंनी निलंगेकरांना सांगितलं आहे.