नवी दिल्ली : एका लग्नाची दुसरी, तिसरी गोष्ट तुम्ही पाहिली असेल मात्र केरळमधील या लग्नाची गोष्ट तुम्ही आतापर्यंत कधीच ऐकली वा वाचली नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नासाठी सुट्टी न मिळाल्याने केरळमधील एका तरुणाला चक्क स्वत:चे लग्न ऑनलाईन पाहावे लागले. केरळच्या कोलम जिल्ह्यातील वेलियम येथे राहणाऱ्या हरीशला लग्नासाठी सुट्टीच मिळाली नाही. त्यामुळे त्याने ऑनलाईन पद्धतीने सौदी अरेबियातून स्वत:च्या लग्नास उपस्थिती दर्शवली.


दरम्यान, हरीश लग्नसोहळ्यास उपस्थित होऊ न शकल्याने हरिशच्या बहिणीने नववधू शामला हिच्यासोबत सप्तपदी पूर्ण केल्या. केरळी न्यूज ऑनलाईनच्या रिपोर्टनुसार हरीशला आपल्या कामाच्या जबाबदारीमुळे लग्नाला हजर राहता आले नाही.


त्यामुळे लग्नाचे सर्व विधी त्याने वेबकॅमद्वारे पाहिले. यावेळी दोन्ही घरातील नातेवाईकांनी संपूर्ण जबाबदारी व्यवस्थित पार पडत लग्न धूमधडाक्यात लावून दिले. 


हरिश सौदी अरेबियाची राजधानी रियाधमधील एका प्रायव्हेट कंपनीत मार्केटिंग मॅनेजर या पदावर काम करतो. तर त्याची पत्नी सरकारी आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत आहे.