मुंबई :  एका कार कंपनीला एका शेतकऱ्याने धडा शिकवल्याचे फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल होत आहेत, १०० वर्षापूर्वी राजस्थानच्या एका राजाने रोल्स रॉयल्स या कंपनीला धडा शिकवला होता, तसा धडा एका कार कंपनीला शेतकऱ्याने शिकवला असल्याची चर्चा व्ह़टस अॅपवर फिरत होती. मात्र हा किस्सा राजस्थानातील कोटा शहराचा आहे. तेथील एका उद्योजकाने ही १० लाखाची कार कंटाळून कचरा जमा करण्यासाठी दिली आहे.


थोडक्यात १०० वर्षापूर्वीचं प्रकरण समजून घेऊ....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोल्स रॉयल्स ही कंपनी आधी तुमचं आर्थिक स्टेटस पाहते, आणि त्यानंतर तुम्ही कार खरेदीसाठी योग्य आहात की नाही ते ठरवते. 


ही गोष्ट साधारण १९२० सालची आहे. लंडनमध्ये सायंकाळी राजस्थानच्या अलवारचे राजे जयसिंह साध्या कपड्यात बॉन्ड स्टिटवर फिरत होते. त्यांनी रोल्स रॉयल्स या कार कंपनीचं भव्य शो रूम पाहिलं. राजाला कार खरेदीचा मोह झाला. 


राजाला गेट आऊट केलं...


राजे शो रूममध्ये गेले, मॅनेजरने त्यांना कंगाल भारतीय म्हणून गृहित धरलं, तर सेल्ममनने गेट आऊट असंच सांगून टाकलं.


राजाने ७ कार खरेदी केल्या...


राजे जयसिंह हॉटेलवर आले, त्यांनी शो रूमला निरोप धाडला, अलवारचे राजे जयसिंह हे कार खरेदीसाठी येत आहेत. कुणीतरी राजे येणार म्हणून सेल्समनने त्यांना रॉयल ट्रिटमेंट दिली. राजांना पाहून ते नतमस्तक झाले, त्यांनी ७ रोल्स रॉयल्स खरेदी केल्या.


अट एकच...


७ रोल्स रॉयल्स त्यांनी भारतात आणल्या आणि अलवार नगपरिषदेला भेट दिल्या, पण अट एकच होती, या गाड्या फक्त कचरा भरण्यासाठी वापरायच्या.


बातम्या छापून आल्या...


या ७ कार कचरा गाड्या झाल्या, लंडनमध्ये या बातम्या फोटोसह छापून आल्या. महिनाभर असंच सुरू होतं, कंपनीने अखेर लेखी स्वरूपात माफी मागितल्यावर कचऱ्यातून रोल्स रॉयल्सची सुटका झाली.


शेतकऱ्याचा असा किस्सा व्हॉटस अॅपवर फिरतोय... पण खरं काय...



 शेतकऱ्याची कहाणी असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र हा फोटो कुठला आहे ? हे निश्चित सांगता येणार नाही, कारण हा फोटो व्हॉटस अॅपवर फिरतोय. ही कार वारंवार खराब होत होती, पाचव्या वेळेस कार दुरूस्त करण्यास कंपनीने नकार दिला. 


शेतकऱ्याने तडकाफडकी ही कार ग्रामपंचायतीला भेट दिली, पण अट एकच आहे, ही गाडी फक्त कचरा भरण्यासाठी वापरायची. पण खरा किस्सा काही वेगळाच आहे.


खरी कहाणी


ही कार शेतकऱ्याने नाही, तर एका उद्योजकाने दिली असल्याचं स्पष्ट झालं आहे. ही कार या उद्योजकाने राज्यस्थानातील कोटा शहराला दिली. हा उद्योजक कंपनीच्या खराब सर्व्हिसने नाराज होता. शेवटी ही कार कचरा जमा करण्यासाठी देण्यात आली, त्याचं नाव राजेश पारेता असल्याचंही सांगण्यात येतं. ही कार २०१२ मध्ये खरेदी करण्यात आली होती. या कारची किंमत १० लाख रूपये आहे.