महाराष्ट्रामध्ये एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस
दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
नवी दिल्ली : दुष्काळाचा प्रचंड मार सहन करत असलेल्या महाराष्ट्रामध्ये येत्या एक दोन दिवसांत रिमझीम पाऊस पडेल असा अंदाज, भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे.
दरम्यान अंदमानमध्ये मान्सून सक्रीय झाल्याची माहितीही, भारतीय हवामान खात्यानं दिली आहे. बंगालच्या उपसागरात पावसाला अनुकूल बदल दिसून येत आहे. तर केरळमध्ये मान्सून दाखल झालाय. गोव्याच्या दिशेने पाऊस सरकतोय. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत महाराष्ट्रात पाऊस पडेल, असे भारतीय हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले.
स्थानिक पातळीवर गेल्या काही दिवसांत वाढलेले तापमान आणि हवेतील वाढतेलले बाष्पाचे प्रमाण यामुळे पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढील दोन दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची शक्यता आहे, असे भारतीय हवामान वेध शाळेने स्पष्ट केलेय.