मुंबई : लवकरच इंधनासाठी पेट्रोल पंपावर लागणाऱ्या रांगा दिसेनाशा होणार आहेत. कारण, अशाच एका योजनेवर सध्या केंद्र सरकार विचार करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यानुसार, पेट्रोल - डिझेल ग्राहकांना घरपोच मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. पेट्रोलियम मंत्रालयानं ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिलीय. 


'प्री-बुकिंगवर ग्राहकांना त्यांच्या घरीच पेट्रो उत्पादनं पोहचवण्याच्या पर्यायावर विचार सुरू आहे. यामुळे, ग्राहकांचं पेट्रोल पंपावर होणारी वेळेचं नुकसान टळेल आणि लांबच लांब रांगांपासून सुटका मिळेल'.


उल्लेखनीय म्हणजे, पेट्रोलियम उत्पादनांच्या वापरात जगभरातील सर्वात मोठ्या देशांमध्ये भारताचा तिसरा क्रमांक लागतो. भारतात पेट्रोल पंपांवरून वार्षिक २५०० करोड रुपयांचं इंधन खरेदी होते. देशभारत प्रत्येक दिवशी जवळपास ३.५ करोड लोक ५९,५९५ पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल खरेदी करतात. 


आता, पेट्रोलियम मंत्रालयाच्या विचारानुसार, १ मेपासून काही ठराविक शहरांत पेट्रोल - डिझेल ग्राहकांना घरपोच मिळण्यावर विचार केला जातोय.