`मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार नाही`
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.
नवी दिल्ली : ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. मुस्लिम महिलांचं आयुष्य उद्धवस्त करण्याचा अधिकार कोणालाही नाही. संविधानानुसार मुस्लिम महिलांना न्याय द्यायची जबाबदारी सरकार आणि नागरिकांची आहे, असं मोदी म्हणाले आहेत.
मुस्लिम मतांसाठी या महिलांना त्यांच्या मुलभूत अधिकारांपासून दूर ठेवलं जात असल्याचं मला आश्चर्य वाटत असल्याची प्रतिक्रियाही मोदींनी दिली आहे. ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून बराच वाद सुरु आहे. विधी आयोगानं समान नागरी कायद्यासंदर्भात देशभरातून मत मागवली आहेत. याला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानं त्याला तीव्र विरोध सुरू केलाय.