महाराष्ट्राच्या चित्ररथावर दिसणार लोकमान्य टिळक
२६ जानेवारीच्या राजपथवरील शानदार परेडमध्ये यावर्षी लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
नवी दिल्ली : २६ जानेवारीच्या राजपथवरील शानदार परेडमध्ये यावर्षी लोकमान्य टिळक यांच्यावर आधारीत महाराष्ट्राचा चित्ररथ सहभागी होणार आहे.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळणारच... या लोकमान्यांच्या सिंहगर्जनेचे सध्या जन्मशताब्दी वर्ष सुरु आहे.
यावर्षी म्हणजे २०१६ च्या जानेवारीमध्ये रोटेशन पद्धतीमुळे राज्याचा चित्ररथ सहभागी झाला नव्हता. त्यामुळे येत्या जानेवारीमध्ये लोकमान्यांच्या सिंहर्जनेवर आधारीत चित्ररथ साकारला जाणार आहे.
अनेकदा २६ जानेवारीच्या परेडमध्ये राज्याच्या चित्ररथाला सर्वोत्कृष्ठ चित्ररथाचे पारितोषिक मिळाले आहे. त्यामुळे यावेळच्या महाराष्ट्राच्या चित्ररथाकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागलेले असेल.