नवी दिल्ली : देशातील सर्वात मोठी इंजीनिअरिंग कंपनी लार्सन अँड टर्बो(एल अँड टी) ने गेल्या तीन महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठी कपात केलीये. कंपनीने या कालावधीत तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही संख्या कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या 11.2 टक्के इतकी आहे. व्यापारात मंदी आल्याने कंपनीने हा निर्णय घेतल्याचे म्हटलेय. कंपनीमध्ये डिजिटलायझेशन होत असल्याने अधिक कर्मचाऱ्यांची कंपनीला गरज नसल्याने त्यांना नारळ देण्यात आलाय.


एल अँड टीचे सीएफओ आर. शंकर रमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या स्टाफची संख्या योग्य स्तरावर आणण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. डिजिटलायझेशन तसेच उत्पादकता वाढवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आलाय.