नवी दिल्ली : शेतीपूरक योजनांच्या सुधारणांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. नीती आयोगानं याबाबतची वार्षिक आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रापाठोपाठ गुजरात, राजस्थान या राज्यांचा नंबर लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रानं शेती क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणावर सुधारणा केल्या, ज्याच्यामुळे कृषी व्यवसायासाठी चांगलं वातावरण तयार झाल्याची प्रतिक्रिया नीती आयोगानं दिली आहे. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम, झारखंड, तामीळनाडू आणि जम्मू काश्मीर यांनी शेती सुधारणांबाबत वाईट कामगिरी केल्याचा ठपकाही नीती आयोगानं ठेवला आहे.