नवी दिल्ली : देशातल्या सर्वाधिक प्रदुषित शहरांच्या यादीत महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नवी मुंबई आणि बदलापूरसह एकूण सतरा शहरांचा समावेश आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकारने 94 शहरात सर्वाधिक वायुप्रदूषण होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. 2011 ते 2015 दरम्याच्या कालावधीत केलेल्या सर्वेक्षणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुख्य शहरे वगळता महाराष्ट्रातील कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, उल्हासनगर या शहरांतील हवा अत्यंत वाईट आहे.


महाराष्ट्रात पुणे, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरात हवेतील धोकादायक कणांचं अतिरिक्त प्रमाण आहे. त्यासोबतच नायट्रोजन डाय ऑक्साईड या वायुप्रदूषण करणाऱ्या एका अत्यंत धोकादायक पदार्थाची पातळीही अधिक आहे. या प्रदूषणावर तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्र्यांनी दिल्या आहेत.


दरम्यान, महाराष्ट्राबरोबर उत्तर प्रदेशातील 15, पंजाबमधील 8 तस निसर्गाने नटलेल्या हिमाचल प्रदेशातही प्रदूषणात वाढ होत आहे. येथील 7 शहरांता हवा धोकादायक आहे. गुजरातमधील सुरत, तामिळमाडूतीमधील तुतीकोरीन, कर्नाटकमध्ये 4 शहरे आणि आंध्र प्रदेशमधील 5 शहरांचा समावेश आहे.