कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विटरवर घोळ घातला आहे. ममता बॅनर्जी यांनी थेट गझल गायक जगजित सिंह यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांचं ट्विट केलं आहे. 
जगजित सिंह यांचं ऑक्टोबर 2011 मध्ये निधन झालं. निधन झालेल्या व्यक्तीला आपण आदरांजली वाहतो, पण ममता बॅनर्जींनी जगजित सिंहांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आपल्या या ट्विटमध्ये ममता दीदींनी जगजित सिंह यांच्याबरोबरच झाकिर हुसेन आणि क्रिकेटर मोहमद अझरुद्दीनलाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ममतांचं ते ट्विट


पण जगजित सिंहांबाबतची आपली चूक लक्षात आल्यावर ममता दीदींनी हे ट्विट बदललं, आणि जगजित सिंह यांच्या आठवणी जाग्या झाल्याचं म्हंटलं.


ममतांचं नवं ट्विट