जूनागड : १४ फ्रेब्रुवारी... व्हॅलेन्टाईन डे... प्रेम व्यक्त करण्याचा दिवस... हा दिवस आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर साजरा करण्याचे प्रत्येकाचे फंडे वेगवेगळे असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असाच प्रेमाचा हिवताप गुजरातच्या एका बँकेतील अधिकाऱ्याला चढलाय. दिग्विजय सिंह असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. दिग्विजय यांनी व्हॅलेन्टाईन या 'सणा'साठी कर्ज मिळावं यासाठी अर्ज केलाय. दिग्विजय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पीओ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी बँकेकडे ४२,९७० रुपयांचं कर्ज मिळावे यासाठी अर्ज सादर केलाय. 


हा अर्ज बँक अधिकाऱ्यांनी रद्दबादल ठरवलाय. त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी वसंत पंचमीच्या नावावर ४३ हजार रुपयांच्या कर्जासाठी दाखल केलाय. हा अर्ज मात्र बँकेकडून स्वीकार करण्यात आलाय.