रायपूर :  छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात एका मदरशामध्ये शिकणारी अल्पवयीन मुलीवर रेप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी रेप प्रकरणी आरोपीला अटक केले आहे. आरोपीने मुलीवर अनेकवेळा रेप केला त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडीत मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपी आबाद फारुकीला अटक केली आहे. १४ वर्षांच्या मुलीने मदरशामध्ये मुलाला जन्म दिला आणि त्यावेळी घटना स्थळावरावरून आरोपी फरार होत असताना मदरसा डायरेक्टर त्याला पकडले. 


मुलीने मदरशात जाण्यास दिला नकार 


फारुकी याने मुलीवर अनेकवेळा बलात्कार केला. ती त्याच मदशामध्ये शिकत होती. ती काही दिवसांनंतर घरी आली पण ती पुन्हा मदरशात जाण्यास नकार देत होती. त्यानंतर मुलीला दुसऱ्या मदरशात शिकण्यास पाठविले. 


आरोपीने दिली होती जीवे मारण्याची धमकी


मुलीला फारूकीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तीने कुठेच वाच्यता केली नव्हती.