धक्कादायक! मेव्हनीच्या प्रेमात या व्यक्तीने केलं दुष्कृत्य
पंजाबमध्ये मेव्हणीच्या प्रेमात एका व्यक्तीने नात्याला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. मेव्हणीला मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी या व्यक्तीने एका सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे योजना आखली.
पटियाला : पंजाबमध्ये मेव्हणीच्या प्रेमात एका व्यक्तीने नात्याला काळीमा फासणारी गोष्ट केली आहे. मेव्हणीला मिळवण्यासाठी त्याने स्वत:च्या पत्नीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यासाठी या व्यक्तीने एका सिनेमाच्या स्टोरीप्रमाणे योजना आखली.
चरनजीत नावाच्या या व्यक्तीचं ८ वर्षापूर्वी गुरप्रीत सोबत लग्न झालं होतं. दोघांनीही प्रेमविवाह केला होता. पण या दरम्यान काही दिवसातच तो त्याच्या मेव्हनीकडे आकर्षित झाला आणि तिला मिळवण्यासाठी त्याने पत्नीच्या हत्येची योजना आखली.
पत्नीला सासरी घेऊन जाण्याचं नाव करत त्याने मुलीला घरीच ठेवलं आणि फक्त पत्नीला घेऊन रहदारी नसलेल्या रस्त्यावरुन घेऊन निघाला आणि एका नदीमध्ये पत्नीला धक्का दिला ज्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला.
गुडांनी आमच्या डोळ्यात मिरची पावडर टाकली त्यामुळे आम्ही दोघं नदीत पडलो असा या व्यक्तीने करत पोलिसांचं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न केला पण ही गोष्ट महिलेचा मामा आणि पोलिसांना देखील पचत नव्हती.
पोलिसांनी मग त्याच्या फोनची माहिती काढली आणि त्यावरुन त्याचं मेव्हणीसोबत अफेअर असल्याचं समोर आलं. काही दिवसांपूर्वी त्याने पत्नीचा १ कोटींचा विमा देखील काढला होता. चरनजीतला चांगला पोहता येतं तरी त्याने पत्नीला का नाही वाचवलं उपस्थित केला यानंतर पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली त्यानंतर त्याने सत्य सांगितलं.