अजब रिक्षावाला, चिकटविल्या १ हजारच्या नोटा, फोटो व्हायरल
बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे.
अहमदाबाद : बँकांमध्ये ५०० आणि १ हजारच्या जुन्या नोटा ३० डिसेंबरपर्यंत जमा करण्याची मुदत देण्यात आली आहे. पण सोशल मीडियावर एक रिक्षावाल्याचे दोन फोटो खूप व्हायरल होत आहेत. यात त्याने आपल्या ऑटो रिक्षाला संपूर्ण १ हजार रुपयांच्या नोटा टिकटविल्या आहे.
नोटबंदीनंतर गुजरातमध्ये सर्वात जास्त चर्चा महेश शाह आणि किशोर भजियावाले यांच्या झाली. आता या ऑटोवाल्याची चर्चा खूप चर्चा सुरू झाली आहे. या ऑटोवाल्याची ओळख पटलेली नाही. पण ऑटोवर नंबर हा भावनगर आरटीओचा आहे.
पण हे स्पष्ट झाले नाही की सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑटोचे सत्य काय आहे. अद्याप हे स्पष्ट झाले नाही की १ हजार रुपयांच्या नोटा खऱ्या आहेत की खोट्या आहेत.