नवी दिल्ली : उरी हल्ल्यानंतर देशातील नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये भाषणामध्ये म्हटलं की ते पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना शिक्षा देतीलच. पण यानंतर एक व्यक्ती एकटाच पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी निघाला आहे आणि तो पाकिस्तानसाठी निघाला असल्याचीही माहिती एका हिंदी वेबसाईटने दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदू क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव चौधरी हरिद्वार येथून पाकिस्तानसाठी रवाना झाले आहेत. चौधरी यांनी याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचं शीर वेगळं करणाऱ्याला एक कोटी रुपये जाहीर केले होते.


संजीव चौधरी यांनी रविवारी हरिद्वारमधील गंगेची पूजा केली आणि पाकिस्तानसाठी रवाना झाले. त्यांनी म्हटलं की उरी हल्ल्यानंतर देशात असंतोष आणि राग आहे. सरकार आणि सेना त्यांचं काम करत आहे. पण माझी संघटना लोकांच्या भावनेनुसार काम करत आहे.