नवी दिल्ली : निवडणुकीत भाजपला यश मिळालं तर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रिकरांचं पुनरागमन होण्याची शक्यता निर्माण झालीय. गोव्यात नवनिर्वाचित आमदारच मुख्यमंत्री ठरवतील मग तो दिल्लीचा असू शकतो किंवा गोव्यातलाच असू शकतो असं केंद्रीय परिवहन नितीन गडकरींनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुका आणि राज्यातल्या मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीत गडकरींनी हे विधान केलंय. याशिवाय गडकरींनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर आपली रोखठोक मतं मांडली आहेत.