बेळगाव : मराठी भाषक आज काळा दिवस पाळणार आहेत. बेळगावसह संपूर्ण सीमा भाग कर्नाटकात डांबुन आज 59 वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे सीमा बांधव आजचा दिवस काळा दिन म्हणून पाळतात. असं आसताना दुसरीकडे कर्नाटक राज्य आजचा दिवस विजयोत्सव म्हणून साजरा करतं. याचा निषेध नोंदवण्यासाठी आज बेळगावात काळा दिन पाळण्यात येणार आहे. त्यासाठी महाद्वार रोडपासून ते मराठा मंदिरपर्यंत मराठी भाषक मूक मोर्चा काढतायत.


विशेष म्हणजे या मोर्चामध्ये बेळगावच्या महापौर सरिता पाटील दुचाकीवरुन सहभागी झाल्या. कर्नाटक सरकार कारवाई करेल, या भितीनं त्या तोंडावर काळी पट्टी बांधून सहभागी झाल्यायत. यापूर्वीचे महापौर किरण सायनाक आणि महेश नाईक यानी कर्नाटक सरकार कारवाई करेल या भीतीने मोर्चाकडे पाठ फिरवली होती.