मुंबई : विवाहीत महिलादेखील आपल्या वृद्ध आई-वडिलांच्या देखरेखीसाठी बाध्य आहेत, असं हायकोर्टाला बजावून सांगावं लागलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलांसोबतच पालकांना सांभाळण्याची जबाबदारी ही विवाहीत महिलांचीही आहे... केवळ, विवाह झालाय म्हणून वृद्ध पालकांची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही असं हायकोर्टानं म्हटलंय. 


एखाद्या केसमध्ये वडिलांनी आपल्या मोठ्या मुलावर आपल्या खर्चाची जबाबदारी उचलण्यासाठी कलम १२५ (१) (डी) नुसार केस दाखल केली असेल, तर कोर्टाला त्यांची जबाबदारी योग्य व्यक्तीवर सोपवण्याचा हक्क असतो. अशा वेळेस आपल्या पालकांची जबाबदारी घेण्याची आर्थिक पात्रता असणाऱ्यांकडे कोर्ट ही जबाबदारी सोपावू शकतं. 


काय होतं प्रकरण...


वसंत विरुद्ध गोविंदराव उपासराव नाईक यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना विवाहीत मुलीही आपल्या आईवडिलांच्या देखरेखीसाठी तितक्याच बांधिल असतात, जितकी मुलं... असं म्हटलंय.


विवाहीत मुलगी केवळ त्यांच्या पतीच्या कुटुंबाची जबाबादारी घेण्यासाठी बांधिल असतात आणि आपल्या आई-वडिलांची नाही, हे वक्तव्य न्यायालयानं फेटाळून लावलंय. 


या प्रकरणात विवाहीत मुलगी ही अमेरीकेत एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतेय आणि पर्याप्त साधनं तिच्याकडे उपलब्ध आहेत, अशावेळेस ही मुलगीदेखील आपल्या आई-वडिलांच्या देखरेखीसाठी तितकीच बांधिल आहे, जितका त्यांचा मुलगा, असं न्यायालयानं म्हटलंय.