निवडणुकीनंतर ट्रिपल तलाकला बंदी?
मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा ट्रिपल तलाकच्या प्रथेला कायमची बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.
लखनऊ : मुस्लिम समाजातल्या महिलांसाठी अत्यंत अन्यायकारक अशा ट्रिपल तलाकच्या प्रथेला कायमची बंदी घालण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी म्हटलंय.
पाच राज्यातल्या निवडणूकीचा कार्यक्रम आटोपला की सरकार यासंदर्भातला निर्णय घेणार असल्याचंही रवीशंकर प्रसाद यांनी स्पष्ट केलं. सरकारनं याआधीच ट्रिपल तलाक विषयीची भूमिका सर्वोच्च न्यायालयात स्पष्ट केलीय. त्याला अनुसरुनचं कायदा मंत्र्यांनी हे विधान केलंय.