मायावतींनी केली निवडणूक रद्द करण्याची मागणी
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकालानंतर मायावतींनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीत गडबड झाली असल्याचा आरोप केला आहे. इव्हीअम मशीनमध्ये गडबड केल्याचा आरोप मायवतींनी केला. कोणतंही बटन दाबलं तरी भाजपलाच मत जात होतं असा आरोप त्यांनी केला आहे. मायावतींच्या पक्षाचा या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे.
मायावतींनी म्हटलं की, या प्रकरणी त्या निवडणूक आयोगामध्ये तक्रार करणार आहेत. इव्हीएम मशीन पुन्हा तपासण्याचा आणि पुन्हा निवडणुकीची मागणी त्यांनी केली आहे.
भाजप लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोपही मायावतींनी केला. निवडणूक रद्द करण्याची मागणी मायावतींनी केली. मुस्लीम बहुल भागात भाजपला मतदान कसं झाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला.