नवी दिल्ली : संपूर्ण देशात खळबळ उडवण्याऱ्या दादरी घटने संदर्भात एक महत्त्वाचा रिपोर्ट समोर आलाय. सूत्रांच्या माहितीनुसार घटनेचा बळी ठरलेल्या अखलाकच्या घरी मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे फॉरेंसिक लॅबच्या चाचणीमधून उघडकीस आले.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गोमांस खाल्याच्या अफवेवरून नोएडा येथील दादरीमध्ये तिथल्या स्थानिकांनी अखलाकच्या घरी घुसून त्याची हत्या केली आणि त्याच्या मुलाला गंभीर जखमी केलेले.

उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी घटनेस्थळी जाऊन अखलाकच्या घरात असलेले मांस फॉरेंसिक लॅबकडे पाठविले. मथुरा येथे असलेल्या फॉरेंसिक लॅबचा रिपोर्ट आता आलाय, ज्यात अखलाकच्या घरात मिळालेले मांस हे गोमांसच होते, असे सिद्ध झाले.

आश्चर्याची गोष्ट अशी की सुरवातीला हेच मांस सरकारी पशुचिकित्सकांनी मटण असल्याचे सांगितले होते. त्यानंतर हा रिपोर्ट यूपी सरकारने गृहमंत्रालयाला पाठविला.

राजकारण्यांनी या घटनेचा फायदा मोदी सरकारला टार्गेट करण्यासाठी केला होता. मात्र, मथुरावरून आलेल्या फॉरेंसिक लॅबच्या रिपोर्टवरून आता सिद्ध झाले की ते गोमांसच होते.

काही महिन्यांतच यूपीमध्ये निवडणुका होणार आहेत त्याच्याच जोरावर हा रिपोर्ट आल्याचे दिसतेय.