मेहबूबा मुफ्ती बनतील जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री ?
जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधली 2 महिन्यांची राजकीय कोंडी अखेर फुटलीये. पीडीपी आणि भाजपचे नेते उद्या राज्यापाल एन.एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा करतील.
PDPच्या नेत्या मेहबूबा मुफ्ती यांनी मंगळवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि वेगानं सूत्रं फिरली. काल मुफ्ती यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड झाली आणि मुख्यमंत्री होण्याचा त्यांचा मार्ग मोकळा झाला. त्या जम्मू-काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री असतील.
उपमुख्यमंत्रीपदी भाजपचे निर्मलकुमार सिंह असतील. उद्याच्या भेटीत मुफ्ती सरकारस्थापनेचा दावा करणारं पत्र राज्यपालांना देतील, तर सिंग हे पाठिंब्याचं पत्र सुपूर्द करतील, अशी शक्यता आहे.