नवी दिल्ली : आजपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. त्याच पार्श्वभूमीवर एक विशेष बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत सरकारला सर्वाधिक प्रश्न हे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेनंच विचारलेत. विशेष म्हणजे सरकारला सर्वाधिक प्रश्न विचारणा-या पहिल्या दहा खासदारांपैकी नऊ खासदार महाराष्ट्राचे आहेत. 


या लोकसभेत सगळ्यात जास्त प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी विचारलेत. त्यांनी वर्षभरात 568 प्रश्न विचारलेत. तर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आतापर्यंत एकही प्रश्न विचारलेला नाही. 


सर्वाधिक प्रश्न मनुष्यबऴ विकास मंत्रालयाला विचारण्यात आलेत. इंडिया स्पेंड ऍनालिसीस या संस्थेनं हा सर्वे केलाय, त्यामधून ही माहिती समोर आलीय.