नवी दिल्ली : बाटलीबंद मिनरल वॉटर आता देशभरात एकाच दरानं विकणं बंधनकारक करण्यात आलं आहे. केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी यासंदर्भातला निर्णय जाहीर केला आहे. केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयामुळे आता मॉल, मल्टिप्लेस्कमध्ये होणारी सर्रास लूट थांबणार आहे.


राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दुहेरी एमआरपी बेकायदा ठरवल्यानंतर मुंबई आणि ठाण्यातल्य़ा सुमारे 18 मॉल आणि मल्टिप्लेक्समध्ये धाड टाकून कारवाई केली. महाराष्ट्र वैधमापन विभागावनं मुंबई ग्राहक पंचायतीच्या सहकार्यानं जानेवारी महिन्यात धडक कारवाई केली केली होती. फक्त मॉल्स आणि मल्टिप्लेक्स नाही तर विमानतळांवरही अशाच पद्धतीनं ग्राहकांची लूट होते ही लूट आता थांबणार आहे. मुंबई ग्राहक पंचायतीनं याबाबतच्या तक्रारी करण्याचं आवाहन केलं होतं. ग्राहकांनीही याला चांगला प्रतिसाद दिला होता. त्याचंचं हे यश म्हणावं लागेल. आता सर्वत्र एकाच दरानं बाटलीबंद पाणी मिळणार आहे.