नवी दिल्ली : दिल्ली सरकारमधील पर्यटन आणि सांस्कृतीक मंत्री कपिल मिश्रा यांनी एका नव्या विवादाला वाचा फोडली आहे. पंतप्रधानांवर त्यांनी एक विवादात्मक वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधानांच्या रुपात देशाला एक आयएयआय ऐजंट मिळाला आहे? ज्याप्रकारे पंतप्रधान भारत विरोधातील शक्तीसमोर गुडघे टेकतायत तो एक चिंतेचा विषय आहे. असं ट्विट कपिल मिश्रा यांनी केलं आहे.


कपिल मिश्राने हे ट्विट पठानकोट हल्ल्याच्या चौकशीसाठी पाकिस्तानची जेआईटी टीमला भारतात येण्यासाठी अनुमती दिल्याने केंद्र सरकारवर टीका करण्याच्या उद्देशाने केला आहे.  


दुसऱ्या एका ट्विटमध्ये मिश्रा म्हणतात की, 'हा देशाचा प्रश्न आहे, भाजप-आरएसएस समजत आहे की मोदींनी देशाला धोका दिला आहे यामुळे मोदींनी यावर बोललं पाहिजे. देशापेक्षा कोणीही मोठा नाही.'


कपिल मिश्राच्या ट्विटचा बचाव करत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं की, 'मोदी सरकारची विदेश नीती पूर्णपणे फेल झाली आहे. मदी सरकारने पठानकोट प्रकरणात पाकिस्तान समोर गुडघे टेकले आहेत.