प्रेमाखातर अल्पवयीन मुलगी २० वेळा घरातून पळाली आणि...
प्रेमाखातर एकदा दोनदा नव्हे तर तब्बल २० वेळा घरातून पळून जाणारी एक अल्पवयीन मुलगी १८ वर्षांची झाली आणि पोलिसांनीच सुटका झाल्याची भावना व्यक्त केली.
अहमदाबाद : प्रेमाखातर एकदा दोनदा नव्हे तर तब्बल २० वेळा घरातून पळून जाणारी एक अल्पवयीन मुलगी १८ वर्षांची झाली आणि पोलिसांनीच सुटका झाल्याची भावना व्यक्त केली.
अहमदाबादच्या मणिनगर पोलीस स्टेशनमध्ये हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून चर्चेत आहे. आपल्या प्रेमाखातर एक अल्पवयीन मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली... कोर्टाच्या फेऱ्या आणि मानहानी टाळण्यासाठी मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबतची तक्रार नोंदवली नाही. परंतु, मुलगी सज्ञान होण्यासाठी सहा महिन्यांचा अवधी असल्यानं पोलिसांनी तिला शोधून तिच्या घरी सुखरुप पोहचवलं.
प्रेमात आकंठ बुडालेल्या या मुलीनं आपण आपल्या मर्जीनं घर सोडून गेल्याचं सांगितलं... त्यामुळे साहजिकच कुठलीही कारवाई टळली... परंतु, हाच प्रकार पुढच्या सहा महिन्यात तब्बल २० वेळा घडला... २० वेळा पोलिसांनी घरातून पुन्हा पुन्हा पळून जाणाऱ्या या मुलीला शोधून काढत तिच्या घरी पोहचवलं...
परंतु, आपण वयाची १८ वर्ष पूर्ण केली असून आता आपण सज्ञान झालो आहोत असं या मुलीनं स्वत:च पोलीस स्टेशनमध्ये येऊन सांगितलं... आणि पोलिसांनीच या प्रकरणातून सुटका झाल्याचा अनुभव घेतला.