लखनऊ : गाझियाबादमधील वैशाली मेट्रो स्टेशनवरून ऑटोने प्रवास करणारी इंजिनिअर दीप्ती सारना अचनाक बेपत्ता झाली होती. मात्र, तिनेच आपल्या कुटुंबीयांना फोन करुन सांगितले, मी बिलकुल ठिक आहे. सुखरुप आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने तिचा शोध घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. पोलिसांनी त्यासाठी पथके तयार केली. दीप्तीचे लोकेशन पानीपत मोबाईलवर दिसल्यानंतर पोलिसांनी त्या दिशेन आपला मोर्चा वळविला. त्याचवेळी दीप्तीने कुटुंबीयांना फोन करुन सांगितले मी सुखरुप आहे. काळजी करु नये. त्यामुळे तिच्या बेपत्ता होण्याचे गुढ संपले असले तरी ती गायब कशी झाली याचा प्रश्न आता उपस्थित आहे. यापाठीमागे काय कारण आहे, याचा शोध घेण्यात येत आहे.


उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पोलीस मुख्यालयाला याबाबत सक्त आदेश देत तिला शोधून काढा असे बजावले. त्यानंतर पोलीस यंत्रणा कामाला लागली होती. दरम्यान, गुडगावमध्ये एका ऑनलाई कॉर्मस कंपनीत दीप्ती कामाला होती. बुधवारी ती अन्य मुलींबरोबर वैशाली मेट्रो स्टेशवर आली होती. तेथून ती रिक्षा बसली आणि गायब झाली होती.



गाझियाबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिक्षातून प्रवास करणाऱ्या दोन मुलींपैकी एकीला चाकूचा धाक दाखवून उतरविण्यात आले होते. तर दीप्तीला घेवून रिक्षा चालक फरार झाला. त्यानंतर तिला कोठे घेवून तो गेला याची माहिती नाही. त्यामुळे पोलिसांनी १०० जणांची एक टीम बनविली आणि कामाला लावली होती.


तर पोलिसांनी तात्काळ सुरक्षा दक्षता घेतली. त्यानुसार ड्रोन कॅमेऱ्याचा आधार घेतला. तर सर्व स्थानिक रिक्षा चालकांवरही लक्ष केंद्रीत केली. तशी चौकशी सुरु केली. मात्र, रात्री ९ ते ९.२६ दरम्यान दीप्तीचे लोकेशन पानीपत सापडल्यानंतर पोलिसांनी आपली हालचाल त्या दिशेने केली.