नवी दिल्ली : मोदी सरकारने 8 नोव्हेंबरला देशात 500 आणि 1000 रुपयांच्या नोटाबंदी धोरण लागू केले. त्यामुळे चलनातून या दोन्ही नोटा रद्द झाल्यात. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. दरम्यान, या नोटा बॅंकेत भरण्याची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, नोव्हेंबर ते डिसेंबर या कालावधीत ज्यांनी बॅंकेत बेहिशेबी रक्कम भरली आहे, त्यावर कर आकारण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रोख रकमेवर 60 टक्के कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासंदर्भात आयकर कायद्यात बदल करण्याचीही सरकारने तयारी केली आहे. काल संध्याकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.


गेल्या सतरा दिवसांमध्ये जनधन खात्यांमध्ये तब्बल 20 हजार कोटी रुपये जमा झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. कर कायद्यात बदल करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना अद्दल घडवण्याचा सरकारचा मनसुबा आहे. त्यानुसार बेहिशेबी रोख रक्कमेवर 60 टक्के कर लावण्यात येणार आहे.