रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली :  केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी नोटबंदी म्हणजे काळ्या मांजरीच्या बांधलेली घंटा अशा शब्दांत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. तसेच, नवीन वर्षात दाऊद इब्राहीमला भारतात आणण्याचा प्रयत्न असणार आहे. 


नोटबंदीवर अहिरांची फटकेबाजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- नोटबंदी करून काळ्या मांजरीच्या गळ्यात घंटा बांधली आहे
- ही घंटा वाजयला सुरूवात झाली आहे
- त्याचे परिणाम काळा पैसा ठेवणा-यांना भोगावे लागत आहे.
- ५० दिवसात नोटबंदीचा निर्णय यशस्वीपणे अंमलात आणला गेला
- नोटबंदीचे परिणाम येत्या पाच राज्यातील निवडणूकावर दिसून येतील.
- लोक नोटबंदी निर्णयाच्या बाजूने उभे आहेत.
- लोकांनी जुन्या नोटा जवळ ठेवू नये आणि काळा पैसा बाहेर निघावा यासाठी नवीन अध्यादेश काढला गेला.


काँग्रेसवर टीका 



- काँग्रेस आणि राष्ट्रवादीला ६० वर्षे आंदोलन करावे लागेल.
- भाडेकरू माणसं घेऊन काँग्रेस राजकारण करत आहे.
- काँग्रेसचे राजकारण लहान मुलासारखे बनले आहे.


नोटबंदीने नक्षलवादाला आळा...


- नोटबंदीमुळे नक्षलवादाला आळा घालणे शक्य झाले आहे.
- नक्षलवाद आणि दहशतवादासाठी काळा पैशाचा वापर केला जात असे


दाऊदला भारतात आणणार...


- नवीन वर्षात दाऊद ईब्राहीमला अटक करण्याचा आमचा प्रयत्न आहे.


दिल्लीत उपराज्यपाल चांगले काम करतील 


- आम आदमी पार्टीला कुरघोडीमुळे करण्याची खाज आहे.
- नवीन उपराज्यपाल अनिल बैजल चांगले काम करतील
- बैजल यांना प्रशासनाचा चांगला अनुभव आहे.