कोझीकोड : उरीमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताचे 18 जवान शहीद झाले. हा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं पहिल्यांदाच भाषण झालं. केरळच्या कोझीकोडमध्ये झालेल्या या भाषणामध्ये पंतप्रधानांनी पाकिस्तानला खडसावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानबद्दल काय म्हणाले नरेंद्र मोदी


1 पाकिस्तानच्या दहशतवाद्यांमुळे आमचे 18 जवान शहीद झाले, देश याला विसरणार नाही


2 आम्ही इंजिनियर निर्यात करतो, तुम्ही दहशतवादी निर्यात करता


3 तुम्ही गिलीगीत, बलुचिस्तान हाताळू शकत नाही, काश्मीरबाबत बोलून दिशाभूल का करता?


4 जागतिक पातळीवर भारतानं पाकिस्तानला एकाकी पाडलं


5 पाकिस्तानविरोधात तिथली जनता एक दिवस एकत्र येईल आणि दहशतवादाविरोधात लढेल


6 आमच्या 18 जवानांचं बलीदान व्यर्थ जाणार नाही


7 आम्ही तुमच्याबरोबर लढायला तयार आहोत. तुमच्यात धमक असेल तर गरिबीविरुद्ध लढा


8 सीमेपलीकडून 17 वेळा दहशतवादी पाठवण्याचा प्रयत्न झाला, लष्करानं 110 दहशतवाद्यांना ठार केलं.


9 हे शतक आशिया खंडाचं व्हावं यासाठी पाकिस्तान सोडून आशियातले सगळे देश प्रयत्न करत आहेत.


10 भारत दहशतवादासमोर कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही.