हाजीपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी दिघा- सोनेपूर रेल्वे आणि ब्रिजचं उद्घाटन करण्यासाठी बिहारच्या हाजीपूरमध्ये आले होते. यावेळी पंतप्रधान आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार एकाच स्टेजवर आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नितीश कुमार जेव्हा भाषणाला सुरुवात केली, तेव्हा समोर बसलेल्या नागरिकांनी मोदी-मोदी घोषणा द्यायला सुरुवात केली. या घोषणा ऐकल्यानंतर मोदींनी या समर्थकांना शांत राहून नितीश कुमारांचं भाषण ऐकायला सांगितलं.


दरम्यान पंतप्रधान बिहारमध्ये आले याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, बिहारच्या विकासासाठी केंद्राकडून अशीच मदत मिळावी, अशी प्रतिक्रिया नितीश कुमार यांनी दिली. 


 


मोदींनी केलं समर्थकांना शांत, पाहा व्हिडिओ