गांधीनगर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरातमधील गांधीनगरमध्ये भाजपला धक्का बसलाय. पालिका निवडणुकीत भाजपची पीछेहाट झालेय. भाजपवर सत्ता गमावण्याची वेळ आलेय.


भाजप बॅकटफूटवर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्राबरोबरच राज्यामध्येही असलेली सत्ता आणि दोन्ही सरकारांनी मोठमोठी विकासकामे केल्याचे दाखले देऊनही गांधीनगर नगरपालिका निवडणुकीत भाजपला बॅकटफूटवर जावे लागलेय. काल झालेल्या या अटीतटीच्या निवडणुकीत भाजप १६ आणि काँग्रेसलाही १६ जागा मिळाल्याने येथील महापौर हा ‘चिठ्ठी’ टाकून निवडण्यात येणार आहे. यामुळे येथील सत्ता जाते की राहते याची भाजपला चिंता आहे.


या निवडणुकीत भाजपचा पराभव


गुजरातमध्ये गेल्यावर्षी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होऊन काँग्रेसने आपला तिरंगा फडकवला. गांधीनगर नगरपालिका स्थापन झाल्यानंतर काल झालेली निवडणूक ही दुसरी निवडणूक होती. येथे पहिल्या निवडणुकीत काँग्रेसला ३३ पैकी १८, तर भाजपला १५ जागा मिळाल्या होत्या. 


सरकारी कर्मचाऱ्यांचा दे धक्का


मात्र, काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने २०१२ पासून गांधीनगरवर भाजपची सत्ता होती. या निवडणुकीत भाजपचे संख्याबळ कमी झालेय. गांधीनगरचे वैशिष्ट्य म्हणजे, येथील मोठ्या संख्येमधील मतदार हे सरकारी कर्मचारी आहेत. या निवडणुकीत या कर्मचार्‍यांनीच भाजपला झटका दिल्याचे बोलले जातेय.