नवी दिल्ली : हवामान खात्याच्या सुधारित अंदाजानुसार पाऊस 30 मेच्या एक दिवस आधीच केरळ किनारपट्टीवर दाखल होईल. गेल्या 48 तासात मान्सूनच्या प्रगतीचा वेग वाढल्यानं सुधारित अंदाज देण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्यपणे १ जूनला केरळमध्ये धडक मारणारा मान्सूनचा पाऊस यंदा दोन तीन दिवस लवकर येण्याचं भाकित हवामान खात्यानं आधीच वर्तवलंय.


अल निनो आणि पोषक वातावरणीय परिस्थितीचा विचार करता मान्सूनचं आगमन आणखी लवकर होणार आहे. त्याचप्रमाणे यंदा सरासरीइतकाच पाऊस होईल असंही हवामान खात्यानं म्हटलं आहे.