नवी दिल्ली : उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या जनतेसाठी काहीशी सुखावणारी अशी ही बातमी आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मान्सून लवकरच भारतात दाखल होतोय. येत्या 5 ते 7 दिवसांत मान्सून अंदमानमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज खासगी हवामान संस्था स्कायमेटने व्यक्त केलाय. 


तर केरळमध्ये 28 ते 30 मेदरम्यान येणार पाऊस येण्याची शक्यता आहे. मुंबईकरांना मात्र आणखी महिनाभर मान्सूनची प्रतिक्षा करावी लागणार आहे. कारण मुंबईत १२ जूनपर्यंत पाऊसधारा बरसण्याची शक्यता आहे. 


यंदाच्या वर्षी यंदा 3 ते 4 दिवस आधीच येणार मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.