अजब प्रेमाची गजब गोष्ट...सासूचे जावयावर जडले प्रेम
बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात अजब प्रेम कहाणी समोर आलीये. एक महिला चक्क आपल्या मुलीच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली. इतकेच नव्हे तर सासू आणि जावयाने एक पाऊल पुढे जात लग्नही केले. जेव्हा ते दोघं लग्न करुन घरी पोहोचले तेव्हा मुलगी बेशुद्ध झाली.
पाटणा : बिहारच्या मधेपुरा जिल्ह्यात अजब प्रेम कहाणी समोर आलीये. एक महिला चक्क आपल्या मुलीच्या नवऱ्याच्याच प्रेमात पडली. इतकेच नव्हे तर सासू आणि जावयाने एक पाऊल पुढे जात लग्नही केले. जेव्हा ते दोघं लग्न करुन घरी पोहोचले तेव्हा मुलगी बेशुद्ध झाली.
कोर्टात केले लग्न
आशा देवी असं त्या महिलेचे नाव आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मुलीचे धूमधडाक्यात लग्न लावून दिले. मात्र मुलीच्या नवऱ्याबरोबरच आता त्यांनी लग्न केलेय. त्यांनी पू्र्णिया कोर्टात जाऊन रजिस्टर लग्नही केले.
अशी रंगली प्रेमकहाणी
लग्नानंतर जावई सूरज आजारी पडला. जावई आजारी पडल्याची बातमी समजल्यानंतर आशादेवी जावयाला पाहण्यासाठी गेल्या. याचदरम्यान दोघांचे सूत जुळले. आशादेवी घरी परतल्यानंतरही सूरजशी त्यांचे बोलणे सुरुच होते.
पंचायतीने दिली मान्यता
सासू आणि जावयाच्या लग्नाला तेथील पंचायतनेही मान्यता दिलीये. सासू आणि जावयाचे एकमेकांवर प्रेम असल्याने त्यांना एकत्र राहू दिले पाहिजे. पंचायतीच्या या निर्णयावर ते दोघे खुश आहेत.
या लग्नानंतर मात्र सूरजची पत्नी तिच्या वडिलांसोबत माहेरी आलीये.