ISI च्या 11 हेरांना मध्यप्रदेशातून अटक
मध्यप्रदेशमधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.
भोपाळ : मध्यप्रदेशमधून आयएसआयच्या तब्बल 11 हेरांना अटक करण्यात आली आहे. एटीएसनं ही कारवाई केलीय.
हे 11 हेर कॉल सेंटर चालवत होते. या कॉल सेंटरच्या नावाखाली ते भारतीय लष्कराची गोपनीय माहिती फोडून, पाकिस्तानला पुरवत होते. या कामासाठी त्यांना पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआयकडून पगार मिळत होता.
मध्यप्रदेशचे एटीएस प्रमुख संजीव शमी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा ग्रुप पाकिस्तान स्थित धन्यांच्या आदेशावरून सैन्याची माहिती पुरवत होते. अटक करण्यात आलेल्या पाच जणांना ग्वालियर, जबलपूरमधून दोन, भोपाळहून तीन आणि सतनाहून एकाचा समावेश आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात अटक करण्यात आलेल्या सुखविंदर आणि दादू नावाच्या दोन संशयित हेरांशी - या ग्रुपचा संबंध उघड झालाय.
या दहशतवाद्यांनी पाकिस्तानात संपर्क करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून समांतर टेलिफोन एक्सचेंजही बनवलं असल्याचं शमी यांनी माहिती दिलीय. यासाठी त्यांना खाजगी मोबाईल कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचीही मदत मिळाल्याचं सांगण्यात येतंय.