नवी दिल्ली : समाजवादी पार्टीत यादवी सुरूच आहे. समाजवादी पार्टीचं सायकल निवडणुक चिन्ह कुणाचं याचा वाद आता निवडणूक आयोगाकडे पोहचला आहे. सायकल चिन्हावर दावा ठोकण्यासाठी मुलायम सिंह यादव यांची निवडणूक आयुक्तांसोबत चर्चा केली. त्यांच्यासोबत शिवपाल यादव आणि अमरसिंह देखील होते.


बैठकीनंतर पार्टीत थोड्याफार प्रमाणात मतभेद असल्याचं मुलायम सिंह यादव यांनी सांगितल. अखिलेश भरकटला असून हे मतभेद लवकर मिटवले जातील असंही त्यांनी सांगितलं. तर अखिलेश यांच्याकडून रामगोपाल यादव निवडणूक आयुक्तांची भेटीला रवाना झाले आहेत.