जयपूर : राजस्थानातील मौलवींनी एक वादग्रस्त आदेश काढलाय. कोणत्याही निकाहाच्या वेळी डीजे, बँड किंवा कोणत्याही प्रकारचे मोठ्या आवाजाचे संगीत वाजवण्यास त्यांनी बंदी घातलीय. पण, त्यांनी याला धर्माचा आधार न देता या प्रथांमुळे गरीबांवर भार पडतो असं कारण दिलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'प्रदेश १८' नावाच्या वेबसाईटनं दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील काझी या निर्णयाचे समर्थन करत आहेत. मात्र, या निर्णयाच्या सक्तीला त्यांचा पाठिंबा नाही... ही बाब प्रत्येकाचा खाजगी प्रश्न आहे, असं त्यांचं म्हणणं आहे.


'मोठ्या आवाजातील वाद्य आरोग्यासाठी चांगली नाहीत, पण, म्हणून याची सक्ती करणे योग्य ठरणार नाही', असं त्यांनी म्हटलंय.


मौलवींनी मात्र यापासून फारकत घेत ही सक्ती जो पाळणार नाही त्याला 'निकाह'चा फॉर्म वितरीत करण्यात येणार नाही, असा फतवा काढला आहे. हा आदेश किती प्रमाणात पाळला जातो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.