लखनऊ : उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अवैध कत्तलखान्यांविरोधात सुरु केलेल्या मोहिमेचं  शिया पंथिय मुस्लिमांनी स्वागत केलं आहे. शिया मुस्लिमांनी उत्तरप्रदेशात शिया गो-रक्षा दलाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर गायींची होणारी कत्तल रोखण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.


काही दिवसांपूर्वी लखनऊमध्ये झालेल्या ऑल इंडिया शिया पर्सनल लॉ बोर्डाच्या बैठकीत गोमांसला बंदी घालण्याची मागणी केलीय. या बैठकीत गोहत्येसोबतच ट्रीपल तलाकलाही विरोध दर्शवण्यात आला. ट्रीपल तलाक सारख्या प्रथांवर घाला घालण्यासाठी केंद्र सरकारने सती प्रथेसारखा कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.