बंगलुरु : एका लेडीज होस्टेलमध्ये अंडरगार्मेंट चोराने धुमाकूळ घातला आहे. महाराणी आर्टस अॅण्ड कॉमर्स महिला कॉलेजच्या विद्यार्थीनींनी होस्टेलमधून, कुणीतरी अंडरगार्मेन्टस चोरी करत असल्याची तक्रार केली आहे. कॉलेजच्या होस्टेलमध्ये रात्री कुणीतरी अज्ञात व्यक्ती घुसतो आणि सुकवायला टाकलेले अंडरगार्मेन्टस घालून निघून जातो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

होस्टेलच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना १२ फेब्रुवारी रोजीचं सीसीटीव्ही फुटेज देखील सोपवलं आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती रात्री येतो, होस्टेलमध्ये घुसून सुकवायला टाकलेले अंडरगार्मेन्ट घालतो, यानंतर सुरक्षा रक्षक त्याच्यामागे पळतो, पण तो पळून जाण्यास यशस्वी ठरतो.


प्राचार्या शांताकुमारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती अनेकवेळा होस्टेल परिसरात दिसून आली आहे, होस्टेलच्या भिंतीवरून उडी मारताना त्याला यापूर्वीही मुलींनी पाहिलं आहे, काही महिन्यांपूर्वी, एका मुलीला हा दिसला, तेव्हा ती घाबरली होती. तेव्हापासून आतापर्यंत त्याचा पत्ता नव्हता, पण तो फेब्रुवारी महिन्यात पुन्हा दिसला. एका विद्यार्थीनीने सांगितलं की, तो त्याच्या सोबत डझनभर अंडरगार्मेन्टस घेऊन गेला.


हा चोर त्याच भागातील असू शकतो असा पोलिसांना संशय आहे, हा चोर लवकरात लवकर पकडला जाईल, अशी अपेक्षा पोलिसांना आहे.