इंदूर : तो मुस्लिम आहे, त्याच्या दिवसाची सुरूवात नमाज पठन आणि गाय तसेच भगवान कृष्णाच्या कथेने होते. मोहंमद फैज असं त्याचं नाव आहे. तो रायपूरमध्ये प्रोफेसर होता, लाखो रूपयांची नोकरी सोडून तो लोकांना आता गोकथा ऐकवतोय.


कांदबरीतलं मुस्लिम पात्र आपल्या जीवनात जिवंत केलं....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यशास्त्र विषयात एमए केलेले फैज हे रायपूरमध्ये प्रोफेसर होते, फैज खानचे आई-वडिलही शिक्षक होते.


कादंबरीकार गिरीश पंकज यांच्या एका गाईच्या आत्मकथेवर आधारीत कादंबरी वाचल्यानंतर फैज खानने त्या कादंबरीतलं पात्र जगण्याचं ठरवलं.


या कांदबरीतील नायक मुस्लिम होता, यानंतर फैज खान संत गोपालमणी यांना हिमालयमध्ये भेटले, त्यांनी धेनु मानस ग्रंथ वाचला आणि यानंतर गोकथा वाचकाचं काम करू लागले.


गो कथा एक मुस्लिम व्यक्ती ऐकवणार, हे वाचून अनेक जण कार्यक्रमाला गर्दी करतात. फैज रमजानमध्ये ३० दिवस रोजा ठेवतात.


दिवसातून एक वेळेस नमाज पठन होतेच...


खान आपल्या दिवसाची सुरूवात फजरच्या नमाजने करतात.
यानंतर गोकथा दिवसभर कधी कधी सुरू असते, यात वेळ मिळाला तर जोहर, असर, मगरीब आणि ईशा नमाजचं तो पठन करतो.


फैज ५१ दिवस गाईच्या दुधावर राहिले होते...


मोहंमद फैज खान मागील वर्षी ५१ दिवस गाईच्या दुधावर राहिले होते. फैज २४ तासात दोन लीटर गाईचं दुध पित होते.
फैज म्हणतात, देशी गाय आता कमी झालेल्या आहेत, त्यासाठी गो हत्येवर प्रतिबंध लावण्याचा त्यांनी निश्चय केला आहे, त्यासाठी दिल्लीत फैज खान यांनी उपोषण देखील केलं आहे.