नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केलेली सीबीएसईच्या अध्यक्षांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रद्दबातल ठरवली आहे. आठवड्याभरापूर्वीच स्मृती यांच्याकडून मनुष्यबळ विकास खाते काढून घेण्यात आले. त्यानंतर मोदी सरकारकडून त्यांना मिळालेला हा दुसरा धक्का आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डॉ. सर्वेंद्र विक्रम बहादुर सिंह यांची सीबीएसईच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. परंतु नरेंद्र मोदी यांनी ही पूर्ण प्रक्रियाच रद्द केली आहे. हे पद केंद्रीय स्टाफींग स्किमद्वारे भरण्यात येईल असे डिपार्टमेंट ऑफ पर्सनल ट्रेनिंगकडून मनुष्यबळ विकास खात्याला मिळालेल्या पत्रात म्हटले आहे.


या पदासाठी कमीत कमी 3 वर्षे शैक्षणिक प्रशासनात अनुभव असणारा अधिकारी संयुक्त सचिव पातळीवर असणे आवश्यक आहे. पण गेल्या दीड वर्षापासून सीबीएसई पूर्णवेळ अध्यक्षाविनाच काम करत आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाचे राजकारणात काय पडसाद उमटतात हे बघणं आता औत्सुक्याचं ठरेल.