नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  बेहिशेबी मालमत्ता ३० सप्टेंबरपर्यंत जाहीर करण्याचा सल्ला दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या महत्त्वाकांक्षी मन की बात या रेडिओवरील कार्यक्रमातून देशवासियांशी त्यांनी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. 


या कार्यक्रमाच्या एकविसाव्या भागातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात चांगला पाऊस पडावा यासाठी इच्छा व्यक्त केली. तसेच नागरिकांनी पावसाचा आनंद घ्यावा, पण थेंब न थेंब साठवून ठेवावा, असेही म्हटले आहे. 


स्वेच्छेने अघोषित देशांतर्गत संपत्ती जाहीर करणारे लोक स्वत:वर होणारी दंडात्मक कारवाई होण्यापासून बचाव करू शकणार आहेत. सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात फक्त दीड लाख लोकांचे उत्पन्न 50 लाखांहून अधिक असल्याची खंत आहे. नियमित कराचा भरणा करणार्‍यांची देखील यापुढे काळजी घेतली जाणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.


मोदी म्हणाले की, सरकारने बेकायदेशीररित्या संपत्ती बाळगणाऱ्या नागरिकांना अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत देऊ केली आहे. त्यामुळे अश्या लोकांनी ३० सप्टेंबरपर्यंत अघोषित संपत्ती उघड करावी. त्यानंतर मात्र कर बुडव्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.