नवरात्रींच्या उपवासातही मोदींचे बिझी शेड्यूल्ड
चैत्रातील नवरात्र सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या उपवासात ते केवळ गरम पाणी, दूध आणि ज्यूसचे सेवन करतायत. नवरात्रीच्या या कडक उपवासादरम्यानही त्यांचे शेड्यूल्ड मात्र चांगलेच बिझी आहे.
नवी दिल्ली : चैत्रातील नवरात्र सध्या सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही नवरात्रीचे उपवास सुरु आहेत. या उपवासात ते केवळ गरम पाणी, दूध आणि ज्यूसचे सेवन करतायत. नवरात्रीच्या या कडक उपवासादरम्यानही त्यांचे शेड्यूल्ड मात्र चांगलेच बिझी आहे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात इन्फ्रास्ट्रक्चर, न्याय, टेक्नॉलॉजी तसेच अध्यात्माशी संबंधित कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. रविवारी पंतप्रधान देशातील सर्वात मोठा बोगद्याचे लोकार्पण करणार आहेत. जम्मू आणि श्रीनगर यांना जोडणारा चेनानी-नाशरी बोगद्यामुळे या दोन शहरातील अंतर कमी होणार आहे.
या उद्घाटनानंतर ते उधमपूर येथे एक सभा घेतील. जम्मू-काश्मीरमध्ये जाण्यापूर्वी ते अलाहाबाद हायकोर्टच्या १५०व्या स्थापना दिनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात ते सहभाग घेणार आहेत. याआधी शनिवारी ते हैदराबाद हाऊसमध्ये मलेशियाचे पंतप्रधान नजीब रज्जाक यांची भेट घेणार आहेत.
पंतप्रधान मोदींसाठी चैत्रातील नवरात्रीचे महत्त्व अधिक आहे. याशिवाय शारदीय नवरात्रतही मोदी ९ दिवस उपवास ठेवतात. सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी दोन्ही नवरात्रीत उपवास करतात. यादरम्यान ते केवळ पाणी, दूध आणि ज्यूसचे सेवन करतात. इतका कडक उपवास करुनही ते कोणतेही काम झोकून देऊन तसेच समर्पणाने करतात.