२०२२ पर्यंत शेतकऱ्यांना दुप्पट नफा - नरेंद्र मोदी
गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना विकासाशी जोडणे आवश्यक आहे.
महू : गावांना विकासाच्या प्रवाहात आणून त्यांना विकासाशी जोडणे आवश्यक आहे. शेतकऱ्याला पाणी मिळाल्यास तो मातीतून सोनं पिकवेल. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांना दुप्पट नफा मिळवून देणार, असं आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलं आहे.
मध्यप्रदेशातील महू या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थानी जाहीर कार्यक्रमात मोदी बोलत होते. स्वातंत्र्य मिळून इतकी वर्षे उलटली तरी अद्याप १८ हजार गावांमध्ये वीज नाही. गावांपर्यंत विकास पोचविणे आवश्यक आहे.
जे दिवसरात्र गरीब, गरीब म्हणत आहेत. त्यांनी गरिबांसाठी काय केले याचा हिशेब धक्कादायक आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर टीका केली.