नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  मला मारुन टाकतील, एवढे ते मला वैतागले आहेत,  असे वक्तव्य दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलंय.
 
केजरीवालांनी व्हिडीओ संदेशातून केंद्र सरकारवर हा निशाणा साधला.  आम आदमी पक्षाच्या आमदाराला अटक झाली, त्यानंतर आप खासदार भगवंत मान यांनी  संसदेच्या व्हिडीओ काढला या वादाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी व्हिडीओद्वारे हे मत मांडलं आहे.
 
दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव झाला आणि आप सरकारच्या चांगल्या कामावर मोदी नाराज आहेत. अनेक कारणांमुळे मोदी आम आदमी पक्षावर संतापले आहेत.   


पंतप्रधान मोदी संतापाच्या भरात निर्णय घेतात ते देशासाठी घातक आहे, मोदींना आपचे यश पचवणे जड जातेय असा आरोप केजरीवालांनी केला आहे.