नवज्योत सिंग सिद्धू आणि त्यांच्या पत्नीने दिला भाजपचा राजीनामा
माजी खासदार आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
चंदीगड : माजी खासदार आणि नवज्योत सिंग सिद्ध आणि त्यांची पत्नी डॉ. नवज्योत कौर सिद्धू यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
डॉ. नवज्योत कौर यांनी आपल्या विधानसभा सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. बुधवारी आपला राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांना माहिती दिली.
आमदारपद सोडण्याबद्दल नवज्योत कौर म्हटल्या की मी केवळ आपल्या विधानसभा मतदार संघाचे प्रश्न उपस्थित केले आहे. पण माझ्या पक्षाने त्याची परवानगी दिली नाही. ही लोकशाही नाही हुकूमशाही आहे. सामाजिक मुद्दे उपस्थित केले तर ते पार्टीविरोधी कसे होऊ शकतील.
नवज्योत सिंग सिद्धू येत्या आठ सप्टेंबरला नव्या पक्षाची घोषणा करतील. या पक्षाचे नाव आवाज ए पंजाब असणार आहे. यात भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार परगट सिंग आणि लुधियाना जिल्ह्यातील आमदार सिमरजीत सिंग बैंस आणि बलविंदर बैंस यांचाही समावेश आहे.